पालघर – यंदा जिल्ह्यातील कवडास धरणातील सूर्या कालव्याचे दुरुस्ती काम हाती घेतले आहे.त्यामुळे या कालव्याद्वारे शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतींना तसे लेखी पत्र दिले आहे.
सूर्या नदीवरील कवडास व धामणी धरणातून उजव्या व डाव्या तीर कालव्याद्वारे डहाणू,पालघर तालुक्यातील वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, कासा, तवा, धामटणे, पेठ, कोल्हाण,आंबेदे बऱ्हाणपूर, नानीवली, रावते, चिचारे, बोरशेती तर थेरोंडा, सोनाळे, चारोटी, सारणी, रानशेत, उर्से, म्हसाड आदी गावांना उन्हाळी भात शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.यामधून जवळपास १ हजार हेक्टरवर जमीन ओलीताखाली येते.मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने कालव्यांना ठिकठिकाणी गळती झाल्याने दरवर्षी हजारो लिटर पाणी वाया जात आहे.याबाबत वेळोवेळी स्थानिक प्रतिनिधी, शेतकरी यांनी कालव्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्यामुळे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.