\’सुसाइड नोट\’मधील हस्ताक्षर दर्शनचेच! अहवालात खुलासा

मुंबई :- मुंबई \’आयआयटी\’चा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राबाबत मोठा खुलासा करण्यात आला. दर्शन सोळंकी याने आत्महत्यासंदर्भात लिहिलेल्या एका पत्रातील हस्ताक्षर हे दर्शन सोळंकी याचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालातून ही माहिती उघड झाली. सुसाइड नोटच्या हस्ताक्षराशी संबंधित हा अहवाल तज्ज्ञाने विशेष तपास पथकाला (एसआयटीला) सादर केला आहे.

पोलिसांनी जप्त केलेली सुसाईड नोट दर्शन सोळंकी याने लिहिलेली असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञाने आपल्या अहवालात म्हटले आहे. \’एसआयटी\’ला ३ मार्च रोजी दर्शन सोळंकीने आत्महत्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोटसुद्धा मिळाली होती. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. दर्शन सोळंकी हा मूळचा गुजरातमधील अहमदाबाद येथील विद्यार्थी \’आयआयटी\’मध्ये केमिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास त्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर पवई पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

Scroll to Top