Home / News / सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकार व सीबीआयला दणका दिला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकार व सीबीआयला दणका दिला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांविरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. ही नोटीस रदद् करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात सीबीआयसह सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.मात्र सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आणि हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला .सीबीआयने २०२० मध्ये रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊसह भाऊ शोविक, आई संध्या आणि वडील इंद्रजीत च्रकवर्ती यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती.मात्र हायकोर्टाने ही नोटीस रद्द केली होती. हाय कोर्टाच्या याच निर्णयाला सीबी आय आणि महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.त्यावर आज सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने सरकार आणि सीबीआयला चांगलेच धारेवर धरले. कोर्टाने म्हटले की, आम्ही तुम्हाला ताकीद देत आहोत. आरोपींमध्ये एक हायप्रोफाईल व्यक्ती असल्याने ही आव्हान याचिका दाखल केली आहे . दोन्ही व्यक्तींची पाळेमुळे समाजात खोलवर रुजली आहेत. तुम्हाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे कोर्टाने ठणकावले आणि महाराष्ट्र सरकार व सीबीआयची याचिका फेटाळून, मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला.

Web Title:
संबंधित बातम्या