सुरत – सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळाला आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि कॅट १ प्रणाली स्थापित करण्यासाठी अतिरीक्त जमीन मिळणार आहे. गुजरात सरकारने २२.३० एकर खाजगी जमिनीच्या अधिग्रहणाला परवानगी दिली असून त्यासाठी २०१३ सालच्या अधीग्रहण कायद्यानुसार परतावा दिला जाणार आहे.गेल्या काही वर्षांपासून सुरतच्या विमानतळावर विमानांच्या उड्ड्णात व विशेष करुन उतरण्यात अडचणी येत होत्या. विमानांना दूसरीकडे वळवणे वा विलंब होणे नित्याचे होते. त्याच प्रमाणे या विमानतळाच्या धावपट्टीवर असलेली प्रकाशयंत्रणा ही कालबाह्य झाली आहे. ती बदलण्यासाठी आणि कॅट १ ही सुरक्षा प्रणाली स्थापित करण्यासाठी अतिरीक्त जमिनीची आवश्यकता होती. या नव्या प्रणालीसाठी आवश्यक असलेली जमीन आता सुरत विमानतळाला मिळणार आहे. यासाठी मागडाणा गावातील जमीन अधिग्रहीत करण्यात येणार असून विमानतळ प्रधिकरणाबरोबर गुजरात सरकार एक परस्पर सहकार्य करारही करणार आहे. जमीन अधीग्रहणासाठी गुजरात सरकारने या वर्षीच्या अर्थसंकप्पात २१५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. अतिरीक्त जमिनीवर नवे मार्ग, इमारती, त्याचप्रमाणे धावपट्टीशी संबंधित कामे केली जाणार आहेत. सुरत मध्ये पावसाळ्याच्या दिवसात दृश्यमान्यता कमी होते त्यामुळेही येथील प्रकाशयंत्रणा बदलण्यात येईल.
सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळालाआता मिळणार अतिरीक्त जमीन
