गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड परिसरातील वूरिया हिल्स मधील सहा प्रस्तावित लोह खाणींना सुरजागड इलाख्यातील सत्तर ग्रामसभांचा विरोध कायम असून गट्टा परिसरातील सात ग्रामपंचायत क्षेत्रातील जवळजवळ पन्नास ग्रामसभांनी याविरोधात ११ मार्च पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला १२ दिवस उलटून गेले असले तरी प्रशासनाने याची दखल तर घेतलीच नाही मात्र पोलीस विभागामार्फत आंदोलनकर्त्यांना नोटीस देऊन नक्षल समर्थक ठरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
भांडवलदारांच्या नियोजनबद्ध कारस्थानाची, सरकार आणि प्रशासन पूर्णपणे पाठराखण करताना देसुन येत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आदिवासी समूहांमधील राजकीय नेते सुद्धा प्रासंगिक लाभासाठी स्वकीयांशी प्रतारणा आणि भांडवलदारांचे समर्थन करताना दिसतात. यामुळे अजूनही आम्हा थानिक आदिवासींवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. जनतेला पायाभूत शिक्षण, आरोग्य वनाधारित रोजगार, शुद्ध पेयजल आहे. त्याची मागणी वेळोवेळी केल्यानंतरही ते मिळत नाही. आणि जनतेची जी मागणीच नाही ते लादल्या जात आहे. सरकारांनी नागणीनुसार विकास प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी कली आहे.