न्यूयॉर्क – नाशाच्या आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सचे पृथ्वीवर परतणे तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले आहे. सध्या सुनीता विल्यम्स अंतराळात रोपट्यांवर संशोधन करण्यात व्यग्र असून ती रोपट्यांना कशाप्रमाणे पाणी द्यावे, यावर अभ्यास करत आहेत.अंतराळातील भारविहीन अवस्थेत रोपट्यांच्या मुळांना पाणी कसे मिळते, यावर सुनिता प्रयोग करत आहेत. त्यासाठी विविध आकारांच्या रोपट्यांचा आणि वेगवेगळ्या पाणी घालण्याच्या पद्धतींचा अभ्यास करत आहेत. या संशोधनामुळे भविष्यात अंतराळ स्थानकांवर रोपटी वाढवणे सोपे होईल. दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विलमोर ५ जून रोजी अंतराळ स्थानकावर आले होते. काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुनिता आणि बुच यांना अंतराळ स्थानकावरील मुक्काम वाढला आहे. आठ-दहा दिवसांसाठी अंतराळ स्थानकावर गेलेली सुनिता आणि बुच तब्बल दीड महिना या अंतराळ स्थानकातच आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |