वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स अंतराळात अडकून पडल्याला पन्नास दिवसांहून जास्त कालावधी लोटला आहे. मात्र विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर यांना कधी आणि कसे पृथ्वीवर परत आणणार याचे नेमके उत्तर काल झालेल्या टेलिकॉन्फरन्समध्येही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने दिलेले नाही.हे दोन अंतराळवीर ८ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेले होते.१३ जून रोजी ते पृथ्वीवर परतणार होते.पण त्यांना आणणाऱ्या स्टारलायनर अवकाश यानात बिघाड झाल्याने अंतराळवीर अवकाश स्थानकावरच अडकून पडले आहेत.