सुनिताला पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेस एक्सचे ‘फाल्कन ९’ रवाना

फ्लोरिडा- आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ५ जूनपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ड्रॅगन यानाद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.या ड्रॅगन यानाला नेण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सने काल दुपारी फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल लॉन्च पॅडवरून त्यांचे ‘फाल्कन ९’ रॉकेट अवकाशात पाठवले.

ड्रॅगन अंतराळ यानाला अवकाशात नेणाऱ्या ‘फाल्कन ९’ या चार आसनी रॉकेटमध्ये नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह असे दोन क्रू सदस्य आहेत.तर सुनिता व बुच यांच्यासाठी
दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना या वर्षी ५ जून रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये आयएसएसमध्ये पाठवण्यात आले होते. दोघेही १३ जून रोजी परतणार होते,परंतु अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे परतणे रखडले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top