मुंबई – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयने नोव्हेंबर २०२४ साठी सीए अंतिम परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. उमेदवार आता eservices.icai.org या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे लॉगिन क्रेडेंशिअल, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून त्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतील. सीए अंतिम परीक्षा ३ ते १३ नोव्हेंबरदरम्यान ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी त्यांचा लॉगिन पासवर्ड विसरले असतील, तर ते लॉगिन विंडोवर उपलब्ध ‘फॉरगॉट पासवर्ड’ पर्याय वापरून पासवर्ड रिसेट करू शकतात. यासाठी उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि जन्मतारीख यासारखी मूलभूत माहिती द्यावी लागेल आणि सुरक्षा प्रश्नाचे उत्तरे देखील द्यावी लागतील. उमेदवारांनी त्यांच्या तपशिलांची अचूकता पाहण्यासाठी नेहमी उलट तपासणी करावी. काही विसंगती असल्यास उमेदवारांनी तपशील दुरुस्त करण्यासाठी परीक्षा आयोजित अधिकार्यांशी संपर्क साधावा, अशी सूचना संस्थेकडून देण्यात आली आहे.