बेलग्रेड – सर्बियाच्या सार्वजनिक दूरचित्रवाणी केंद्राच्या इमारतीला शेकडो विद्यार्थी आंदोलकांनी घेराव घातला. ही वाहिनी राष्ट्राध्यक्ष अलेक्सांडर वुसिक यांच्या समर्थनाच्या बातम्या देऊन पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बाल्कन देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. गेल्या नोव्हेंबरमध्ये सर्बियातील नोवी सड रेल्वेस्थानकावरील छत पडून १५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र जनक्षोभ उसळला आहे. तेव्हापासून विविध पातळ्यांवर आंदोलने, मोर्चे, निर्देशने होत आहेत. या सर्व प्रकरणात येथील सार्वजनिक दूरचित्रवाणी केंद्राने केवळ सरकारच्याच बाजूने बातम्या दिल्या त्याचा रोष म्हणून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सर्बियाच्या ब्रेलग्रेडमधील या इमारतीला तब्बल २२ तास घेराव घातला. यावेळी एक साध्या वेषातील पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे म्हटले आहे. सर्बियात सध्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे.
सिर्बियात दूरचित्रवाणी केंद्राच्या इमारतीला आंदोलकांचा घेराव
