सिमला- गेल्या चार दिवसांपासून हिमाचल प्रदेशातील राजधानी शहरात मुसळधार पावसाने वातावरण पुरते बदलून टाकले आहे.पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून पावसाबरोबर बर्फवृष्टीचा नजाराही पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे.
सिमलासह मनाली, मंडी, लाहौल स्पीती, अटल टनल आणि उंच भागात बर्फ वृष्टी झाली असून आज सकाळपासून अनेक गाड्या या बर्फात फसल्याचे दिसून आले. आज हवामान विभागाने सिमलासह मनाली,कुल्लू आणि मंडी विभागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा यलो अलर्ट जारी केला होता.सोलन जिल्ह्यातील मिरची आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिला आहे.