मुंबई: महाराष्ट्रातीतील बहुतांश मंदिरांत गेल्या काही वर्षांत ड्रेस कोड लागू आहेत. आता मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ड्रेस कोड संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे परिधान करून मंदिरात यावे. फाटक्या जीन्स किंवा तोकडे कपडे घालून येऊ नयेत. तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे.
सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू
