सिडनी समुद्रकिनार पट्टीपर्यटकांसाठी पुन्हा खुली

सिडनी – सिडनी समुद्रकिनाऱ्यावर रहस्यमय काळ्या रंगासारखे गोळे आढळले होते. ही किनारपट्टी आठ दिवस बंद करुन स्थानिक प्रशासनाने स्वच्छता मोहिम राबवली. त्यानंतर आता हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला.न्यू साउथ वेल्स सागरी कार्यकारी संचालक मार्क हचिंग्स म्हणाले की, या गोळ्यामुळे पर्यटकांच्या आरोग्याला धोका होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सिडनी किनारपट्टी पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. हे गोळे फॅटी ऍसिडचे बनलेले आहेत. त्यासोबत साफसफाई आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये सापडलेल्या रसायनांशी सुसंगत आहेत. गोळे कुठून आले, हे शोधण्यासाठी प्रयोगशाळेत चाचणी सुरू आहे. या चाचणीसाठी आणखी काही दिवस लागू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top