मुंबई – सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास मध्य रेल्वे विस्कळीत झाली. सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे डोंबिवली, दिवा, मुंब्रा येथे या मध्य रेल्वे मार्गावरील लोकल १० ते १२ मिनिट उशिराने धावत होत्या. रेल्वे उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या आणि मुख्य मार्गावरील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. तासाभरानंतर सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यात आला. अचानक निर्माण झालेल्या या तांत्रिक समस्येमुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
