सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली

पुणे- सिंहगड घाट रस्त्यावर काल मध्यरात्री पावसामुळे दरडीचा मोठा भाग कोसळला. सिंहगड वाहनतळाच्या एक किलोमीटर आधी असलेल्या बटाटा पॉइंटजवळ ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा मोठा ढीग रस्त्यावर साचल्याने हा रस्ता बंद झाला होता. सकाळी गडावर जाणाऱ्या नागरिकांना या मार्गावर दरड कोसळल्याचे दिसले. त्यांनी याबद्दलची माहिती वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाला दिली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासानाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व वनव्यवस्थापन समितीतर्फे जेसिबीच्या सहाय्याने दरड हटवून गडाचा घाट रस्ता मोकळा केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top