सावंतवाडी- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत.त्यातच आता काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या मडगाव-चंदीगड वन वे स्पेशल स्पेशल ट्रेनला या जिल्ह्यात थांबा देण्यात आलेला नाही.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे, राजापूरनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीसह वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी याठिकाणी सुफरफास्ट रेल्वे गाड्या थांबत नाहीत.काही स्थानकावर दिवा-सावंतवाडी वगळता कोणतीच गाडी थांबत नाही. त्यामुळे १५ जलद गाड्या सिंधुदुर्गमध्ये
कुठेही थांबाच नाही,हे वास्तव आहे.
दरम्यान कालपासून सुरू मडगाव-चंदीगड या वनवे स्पेशलचे थांबे -करमळी, थिवी, पेडणे, रत्नागिरी, रोहा पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, पानिपत आणि अंबाला कॅन्ट असे आहेत. ही वनवे स्पेशल गाडी २२ डब्यांची एलएचबी श्रेणीतील धावणार आहे. यामध्ये वातानुकलीत श्रेणीसह स्लीपर व जनरल डब्यांचा ही समावेश आहे, असे कोकण रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी म्हटले आहे.