मुंबई- मुंबईतील समुद्रात आता आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. सिंगापूर आणि दुबईच्या धर्तीवर अंधेरी येथील वर्सोवा सागर कुटीर समुद्रात ही विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या विद्युत रोषणाईसाठी तब्बल २६ कोटी ५६ लाख ७६ हजार ३९० रुपये खर्च केले जाणार आहेत.
अंधेरी पश्चिम गणेश विसर्जन लेन,जनरेटिव्ह कंटेण्ड अँड डायनॅमिक सीन क्रिएशन, प्रोजेक्शन मॅपिंग टेक्नॉलॉजी इंटर अॅक्टिव्ह फ्लोअर, प्रोजेक्शन मॅपिंग अँड गोबो प्रोजेक्शनच्या माध्यमातुन वर्सोवा समुद्रात ही विद्युत रोषणाई केली जाणार आहे. समुद्र किनारी येणार्या पर्यटकांचे केवळ मनोरंजन व्हावे यासाठी पालिकेचा हा खटाटोप आहे.मुंबईला गिरगाव,दादर,माहीम,जुहू, वर्सोवा अणि अक्सा बीच असे सहा समुद्र किनारे लाभले आहेत. याठिकाणी दररोज हजारो पर्यटक फेरफटका मारण्यासाठी येत असतात.त्यामुळे या सहाही चौपाट्यावर स्वच्छता आणि विविध सुविधा पुरवण्याचे काम पालिका करत असते.
सिंगापूर, दुबईसारखी आता मुंबईच्या समुद्रात विद्युत रोषणाई
