सिंगापूर – सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांची कोविडची चाचणी सकारात्मक आली आहे. दीड आठवड्यात त्यांना दुसर्यांदा कोविडची लागण झाली आहे. त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले की, हे रिबाउंड संसर्गाचे प्रकरण आहे.
ली गुरुवारी सोशल मीडियावर सांगितले, “मला बरे वाटत आहे. परंतु मी पुन्हा कोविड पॉझिटिव्ह झालो आहे. माझे डॉक्टर म्हणतात की, ही कोविड रिबाउंडची केस आहे. केवळ पाच-दहा टक्के प्रकरणांमध्येच या प्रकारे पुन्हा कोविडची लागण होते. यात सुरुवातीच्या तुलनेत संसर्गाचा धोका कमी असतो.”
७१ वर्षीय ली दक्षिण आफ्रिका आणि केनियाच्या सहा दिवसांच्या अधिकृत कामकाजाच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर २२ मे रोजी पहिल्यांदा पॉझिटिव्ह आले होते