सावित्रीबाई फुलेंची बदनामी! ‘इंडिक टेल्स’वरून संताप

मुंबई- नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आल्यानंतर आता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. ‘इंडिक टेल्स’ नावाच्या वेबसाईटवर हे लिखाण वर्षभरापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. ते आता उघडकीस आल्यावर या वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. तिची दखल घेऊन या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
बुधवारी सकाळी विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, पंकज भुजबळ यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर निदर्शने केली. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन या प्रकरणात कारवाई करण्याचीही मागणी केली. भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात सोमवारी पत्रही लिहिले होते
इंडिक टेल्स’ या वेबसाईटने 4 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या आधीच्या हिंदू शिक्षिकांना ओळख का मिळाली नाही, अशा शीर्षकाचा लेख प्रसिद्ध केला होता.
या लेखात अनेक आक्षेपार्ह विधाने आणि आरोप करण्यात आले आहेत. हा लेख वर्षभर वेबसाईटवर होता. तो आता उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला. त्यानंतर अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी सरकारकडे आक्षेप नोंदवले. इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी होऊ लागली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top