रायगड : सावरोली खारपाडा रस्त्यावर पौध गावाजवळ इंडस्ट्रियल गॅस सिलिंडर भरलेला टँकर उलटला. ही घटना आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी थांबवली होती. तसेच गॅस लिक होण्याची शक्यता लक्षात घेता औद्योगिक आपत्ती निवारण तज्ज्ञ धनंजय गीध, विजय भोसले आणि सौरभ घरत घटनास्थळी दाखल होऊन गळती असलेले सिलिंडर बंद केले. त्यानंतर टाटा स्टीलसह काही कंपन्यांची अग्निशमन टीम घटनास्थळी दाखल झाले. तसेच सर्व सुरक्षा यंत्रणा, फायर टेंडर आणि ॲम्बुलन्सदेखील या ठिकाणी सज्ज होत्या. दरम्यान, पोलीस प्रशासनाने गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या गाडीच्या मालकाशी संपर्क साधून त्यांना बोलावले आहे.

 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								







