सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आता सलग १२ तास रिझर्व्हेशन म्हणजेच आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे.सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत आरक्षण खिडकी सुरू असणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध केली आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसेच स्थानिकांनी याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते, त्यानंतर त्यांनी त्वरित पाठपुरावा केल्यानंतर कालपासून
पासून हे रिझर्वेशन काउंटर बारा तास उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबद्दल स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील रिझर्वेशन काउंटर पूर्वी केवळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होते.कुडाळ व अन्य स्थानकात मात्र सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत रिझर्वेशन काऊंटर सुरू आहे. सावंतवाडीत ही सोय नसल्यामुळे रिझर्वेशन करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
याबाबत स्थानिक प्रवाशांनी ९ ऑगस्ट रोजी सावंतवाडी रोड स्थानकाच्या परिसर नूतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाला केलेल्या सूचनेनुसार हे रिझर्वेशन काउंटर आता सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजेच बारा तास सुरू राहणार आहे.