Home / News / सावंतवाडीत १५ नोव्हेंबरला प्रत्येक मंदिरांमध्ये दीपोत्सव

सावंतवाडीत १५ नोव्हेंबरला प्रत्येक मंदिरांमध्ये दीपोत्सव

सावंतवाडी – यंदा शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होणार...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सावंतवाडी – यंदा शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील महिला भगिनींनी पाच तरी पणत्या आपल्या जवळच्या मंदिरामध्ये लावून दीपोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.
गेल्यावर्षी या उपक्रमात मोठ्या संख्येने शहरातील महिलांनी सहभाग घेतला होता.तसेच मंदिरांनी सुद्धा यात सहभाग घेतल्याने शहरातील सर्व मंदिरे उजळून निघाली होती.तरी यावर्षी सुद्धा शहरातील महिला भगिनींनी,विविध मंडळे आणि देवस्थान कमिट्या यांनी एकत्र येऊन शहरातील हा दीपोत्सव साजरा करावा या असे माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या