सातारा- बळी राजाचा जिव्हाळ्याचा सण हा बेंदूर समजला जातो. या सणा दिवशी घरातील बैलाला सजवून त्याची पूजा करून त्याला गोडधोड खायला दिले जाते.त्यानिमित्त सातारा शहरात मातीच्या बैलाच्या जोड्या बनवण्याच्या कामाला वेग आला आहे.शहरातील कुंभारवाड्यात या बैलांना रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
वास्तविक ग्रामीण भागात खराखुर्या बैलाची पूजा केली जाते. परंतु शहरात मात्र माती आणि प्लास्टर ऑफ पॅरीसच्या बैलांची पूजा केली जाते.शहरातील कुंभारवाड्यात मे महिन्यापासूनच हे बैल तयार करण्याचे काम सुरू असते. सध्या मागणीनुसार आकर्षक व रूबाबदार अशा बैल जोड्या तयार झाल्या असून त्यांना रंगवण्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. काही दिवसांतच हे मातीचे बैल विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झालेले दिसतील.