सातारा
सातारा- पुणे मार्गावर खंबाटकी घाटातील एका वळणावर चारचाकी कारचा अपघात झाला. या अपघातात युवक-युवती जागीच ठार झाले आहेत. मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर साताऱ्याकडे येणारी वाहतूक शिरवळ, लोणंदमार्गे वळविण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जाम होऊन इंजिन गरम झाल्याने सुमारे ३० गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. वाहतूक कोंडीत रविवारी दिवसभरात अपघाताच्या एकूण चार घटनाही घडल्या. १४ तासांपेक्षा अधिक काळ दोन्ही बाजूचे घाट रस्ते जाम झाल्याने वाहनचालकासह लहान मुले, अबालवृद्ध प्रवाशांचे हाल झाले.