सातारच्या सुरेखा यादव बनल्या
\’वंदे भारत\’ च्या पहिल्या महिला पायलट

मुंबई – जगभरात भारतीय महिलांचा विविध क्षेत्रात दबदबा वाढत चालल्याचे दिसून येत आहे.भारतीय महिला या आकाशात विमान उडवण्यापासून ते रुळांवरून ट्रेन चालविण्यासाठी सक्षम आहेत.अशा यशस्वी महिलांमध्ये सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव यांचाही समावेश आहे. सुरेखा यादव या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिल्या लोको पायलट आहेत. त्या आता सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणार्‍या पहिल्या महिला पायलट म्हणूनही ओळखल्या जाणार आहेत.

देशातील वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलट म्हणून आता सुरेखा यादव यांनी आपले नाव कोरले आहे.या कामगिरीबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक आठवर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सुरेखा यादव म्हणाल्या, \”नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या पाच मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो.\”

Scroll to Top