मुंबई- साखर कामगारांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने १६ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत साखर उद्योगासह जोडधंद्यातील कामगारांचे वेतन आणि सेवा शर्ती ठरवण्याबाबत त्रिपक्षीय कमिटी गठीत केली.
साखर कामगारांच्या पगारवाढीचे करार आणि त्यांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी, कायम कामगार सेवा निवृत्त होताना त्याला मिळणाऱ्या ग्र्यॅज्युटी रक्कमेत वाढ करण्यात यावी, अनाठायी नोकरी भरती टाळण्यासाठी आणि पगारामध्ये नियमितता आणण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतच अंकुश ठेवण्याचे प्रयत्न करावेत,अशा मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने १६ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारणार आहे. कामगारांच्या मागण्यांवरुन मंत्रालयात अजित पवार यांनी सहकार विभागाची बैठक घेतली.या बैठकीत साखर कामगारांचे वेतन आणि सेवा शर्ती ठरवण्याबाबत त्रिपक्षीय कमिटी गठीत केली.