साई रिसॉर्टप्रकरणी देशपांडेंना
3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

दापोली- दापोली साई रिसॉर्टप्रकरणी माजी प्रांताधिकारी जयराम देशपांडेंना न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबतची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आज ट्विट करुन दिली. देशपांडेंवर साई रिसॉर्टच्या बांधकामासाठी अवैध अनुमती दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जयराम देशपांडेंना 14 मार्चला ईडीने अटक केली होती. आता पोलीस ईडीकडून त्यांचा ताबा घेणार आहे.

Scroll to Top