शिर्डी- शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात आता मोफत भोजन घेण्यासाठी टोकन घ्यावे लागणार आहे. टोकनशिवाय कोणत्याही भाविकाला भोजन घेण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही. आजपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली.
मद्यपान आणि धूम्रपान करुन भाविकांना भोजन कक्षात त्रास देणा-या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसादालयात टोकन पद्धत राबविण्याचा निर्णय संस्थानच्यावतीने घेण्यात आला आहे.साई मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडणार्या भाविकांना उदी-बुंदी प्रसादाबरोबरच साई प्रसादालयातील मोफत भोजनाचे टोकन दिले जाणार नाही.टोकन असल्याशिवाय कुणालाही भोजन घेण्यासाठी प्रसादालयात प्रवेश मिळणार नाही.तरीही हा नियम पाळताना शिर्डीत आलेला कोणताही भाविक उपाशी राहणार नाही,याची दक्षता साई संस्थान घेणार असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे.
भाविकांच्या तक्रारीनंतर मोफत भोजन व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. याठिकाणी सर्वसाधारण हॉलमध्ये मोफत भोजन दिले जाते. दिवसाकाठी सरासरी येथे ५० हजार भाविक साई प्रसादाचा लाभ घेतात.निवास व्यवस्था,साई संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांतील रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही असे टोकन दिले जाणार आहे.