सांगली – सांगलीत इमारतीत व्यंकटेश कैटरर्स नामक व्यवसायिकाच्या घरात आज सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घरात आग लागली. घरातून धूर निघत असल्याने स्थानिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
स्फोटामुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून इमारतीतील दहा घरांच्या आणि तीन वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच घरातील पाण्याच्या टाक्या देखील या स्फोटाच्या आवाजाने फुटल्या आहेत .सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा स्फोट कसा झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे.
सांगलीत घरात गॅस सिलिंडरचा स्फोट
