सांगली:
सांगलीच्या कवठेमहांकाळ पोलिसांनी नागज फाटा येथे मोठी कार्यवाही करून तब्बल एक कोटी १७ लाखाचा गुटखा पकडला आहे. यामध्ये दोन कंटेनर आणि सुगंधी तंबाखू, सुपारी असा एकूण एक कोटी ३७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कवठेमहांकाळ पोलीस आणि सांगली एलसीबीची राज्यातील मोठी कारवाई करण्यात आली आहे. रत्नगिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांना यांना एका खबऱ्यांमार्फत या मार्गावरून गुटख्याच्या कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक यांच्यासह सांगली एलसीबीचे पोलिस याच्या पथकाने सापळा रचला आणि पोलिसांनी कारवाई केली.