Home / News / सांगलीत उपसरपंचाची हत्यागळा चिरून मृतदेह रस्त्यावर फेकला !

सांगलीत उपसरपंचाची हत्यागळा चिरून मृतदेह रस्त्यावर फेकला !

सांगली – खानापूर तालुक्यातील घानवडे गावाच्या माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या करण्यात आली. बापूराव देवप्पा चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या...

By: E-Paper Navakal

सांगली – खानापूर तालुक्यातील घानवडे गावाच्या माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या करण्यात आली. बापूराव देवप्पा चव्हाण असे हत्या करण्यात आलेल्या उपसरपंचाचे नाव आहे . गार्डी नेवरी रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

हत्येबाबतची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली. मृत बापूराव चव्हाण यांना राजकीय पार्श्वभूमी होती, त्यांचे ज्वेलरीचे दुकाने होते. त्यामुळे त्यांची हत्या राजकीय सूडातून झाली की व्यावसायिक कारणातून त्यांचा जीव घेण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी विटा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या