सांगली – सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे. या मार्केटमधील चंद्रभान शर्मा अँड सन्समध्ये देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील शेतकरी विजय नानेकर यांच्या बागेतील २५ हापूस आंब्यांच्या पेट्या आल्या आहेत. या आंब्याच्या १ डझन पेटीला ५ हजार ५०० रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला.याआधी नवी मुंबई आणि पुण्यासह अन्य बाजारांत हापूस आंबा दाखल झाला होता. आंब्याच्या हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला दर मिळाल्याने बागायतदार खूश आहेत.
सांगलीच्या फळ मार्केटमध्ये हापूस आंब्याला उच्चांकी भाव
