मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला दुसऱ्यांदा धमकी मिळून यावेळी धमकी देणार्याने २ कोटी रुपयांची मागणी केली आहे. कालच पोलिसांनी अजित पवार गटाचे विधानसभा उमेदवार झीशान सिद्दीकी आणि सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक केली होती. त्याने पाच कोटींची मागणी केली होती. आज सकाळी मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा आणखी एक मेसेज मिळाला. धमकीचा संदेश पाठवणाऱ्याने दोन कोटी मिळाले नाही तर सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर वरळी, मुंबई पोलिसांनी तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात ३५४(२) आणि ३०८ (४) कलमांतर्गत एफआयआर दाखल केले.