मुंबई – बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या ई-मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. सलमान खान याला यापूर्वीही रवी बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या धमकीच्या मेसेजमध्ये आम्ही तुझा मुंबईतच गेम करणार आहोत, अशी धमकी देण्यात आली आहे. तसेच राखी सावंत हिलाही सांगण्यात आले आहे की, या प्रकरणात जर तू लुडबूड केलीस तर तुलाही सोडणार नाही. या धमकीच्या मेलची राखीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेण्यात आल्याचे समजते. तसेच पोलिसांचे सायबर पथक आता मेल पाहणार्याला ट्रेस करीत आहेत.
सलमान खानला पुन्हा ठार मारण्याची धमकी
