मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजने अंतर्गत सलग पाचव्या वर्षी काल रामदास आठवले यांनी त्यांचे सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते 1 लाख 20 हजार रुपये वार्षिक शुल्क अदा करून पँथर दत्तक घेतला. त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सलग पाचव्या वर्षी पँथर बिबळ्या वाघ दत्तक घेतला.
वनसंरक्षक आणि संचालक एस मल्लिकार्जुन यांच्या हस्ते बिबळ्या वाघ दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र रामदास आठवले यांना सुपूर्द करण्यात आले. या दत्तक बिबळ्या वाघाचे नाव सिम्बा ठेवण्यात आले असून त्याचा पाचवा वाढदिवस आज केक कापुन आणि बुद्ध वंदना घेऊन साजरा करण्यात आला.