मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी मंदीवर मात करत काही प्रमाणात तेजी आली. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ३७ अंकांनी वाढून २३,२१३ अंकांवर तर मुंबई शेअर बाजाराचा निफ्टी २२४ अंकांनी वाढून ७६,७२४ अंकांवर बंद झाला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशंकांमध्ये आज अर्धा टक्का तेजी नोंदली गेली. एनटीपीसी, ट्रेंट पॉवरग्रिड, कोटक महिंद्रा बँक आणि मारुती सुझुकी या कंपन्यांचे शेअर आज सर्वाधिक वाढले.सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० कंपन्यांच्या शेअरपैकी १८ कंपन्यांचे शेअर वाढीसह बंद झाले. तर १२ कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. त्याप्रमाणे निफ्टीमधील ५० कंपन्यांच्या शेअरपैकी २७ शेअरमध्ये वाढ तर २३ शेअरमध्ये घसरण झाली.
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी
