नवी दिल्ली – संसदेच्या दोन्ही सभागृहातील गदारोळामुळे सलग आठव्या दिवशी कामकाज झाले नाही. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त समिती स्थापन करावी या मागणीवरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत गोंधळ घातला होता. दुसरीकडे राहुल गांधींनी विदेशात केलेल्या विधानावर त्यांनी सभागृहात माफी मागावी यासाठी भाजपचे खासदार आग्रही होते. या दोन मुद्यांवरून गुरुवारी सकाळपासून विरोधी आणि सत्ताधार्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा गदारोळ अधिक वाढल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचे कामकाज तहकूब केले. दुसरीकडे राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर सभापती जगदीप धनकड यांनी कामकाज शुक्रवारपर्यंत
तहकूब केले.