मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी गेले काही दिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना एक नवीच युक्ती वापरायला सुरुवात केली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, लेटरबॉम्ब आहेत, कागदपत्रे आहेत, फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत असा ‘सज्जड’ इशारा जाहीर द्यायचा आणि नंतर त्याबद्दल ब्रदेखील उच्चारायचा नाही. जनता प्रतीक्षा करत राहते. परंतु यांना या सोयीस्कर विस्मरणाची ना लाज, ना खंत! आज तेच घडले.
अनिल देशमुख – फडणवीस हे उद्धव, आदित्य ठाकरेंना अडकवणार होते. माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे.
देवेंद्र फडणवीस – अनिल देशमुखांविरुद्ध माझ्याकडे अनेक
पुरावे आहेत.
सचिन वाझे- अनिल देशमुखांचा पीए पैसा गोळा करायचा, सीबीआयकडे पुरावे आहेत.
सचिन अहिर- आरोपी अशी मुलाखत देऊ शकतो का? त्याची नार्को टेस्ट करा.
रावसाहेब दानवे – आमच्याकडे असे अनेक लेटरबॉम्ब आहेत.
नितेश राणे – फडणवीसांकडे सर्वांच्या कुंडल्या आहेत.
गिरीश महाजन – कुणी किती खंडण्या घेतल्या त्याची चौकशी करा. पेन ड्राईव्ह असेल तर दाखवा.
विनायक राऊत – वाझेचा बोलविता धनी भाजपाचा मोठा नेता.
संजय राऊत – तुरुंगातील गुन्हेगार आता भाजपाचे प्रवक्ते
बनले आहेत.
सुप्रिया सुळे – या पत्राची वेळ बघा. बइतकी वर्षे गल्लीत आणि दिल्लीत सत्ता आहे. विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असताना हे पत्र कसे आले?