सिंधुदुर्ग- जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कुडाळच्या सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाजपचे दादा बेळणेकर यांची निवड करण्यात आली आहे.या पतसंस्थेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत भाजपचे पॅनल विजयी झाले आहे.
या सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या विजयी पॅनेलच्या उमेदवारांनी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दादा बेळणेकर यांची सर्वानुमते निवड केली.या निवडीनंतर दादा बेळणेकर आणि नवनिर्वाचित संचालकांनी भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांची सांवतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी विशाल परब यांनी दादा बेळणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दादा बेळणेकर
