नवी दिल्ली- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर सध्या यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या एक्सआरपी या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या युट्यूब चॅनेलवर न्यायालयातील न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. युट्यूब चॅनेलचा वापर प्रामुख्याने घटनात्मक खंडपीठांसमोर सुचीबद्ध केलेल्या खटल्यांची सुनावणी आणि सार्वजनिक हितांच्या प्रकरणांवरील थेट सुनावणीसाठी केला जातो. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक झाल्याचे उघडकीस आले. केंद्रीय तपास यंत्रणाही या हल्ल्यामुळे सतर्क झाल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची वेबसाईटही हॅक करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे युट्युब चॅनल हॅक
