नवी दिल्ली – भारतातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांची यादी एका संशोधन संस्थेने जाहीर केली असून यादीत कोलकाता अव्वल स्थानी तर शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे शहर तिसऱ्या स्थानी आहे.डच लोकेशन टेक्नॉलॉजीज या संशोधन संस्थेने जाहीर केलेला हा सर्वेक्षण अहवाल सन २०२४ मधील आहे.त्या आधीच्या वर्षी म्हणजेच सन २०२३ मध्ये बंगळुरू हे शहर सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले होते. मात्र २०२४ मध्ये कोलकाताने याबाबतीत बंगळुरूला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.सर्वेक्षणात वाहनांना दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ तपासला जातो. कोलकातामध्ये वाहन चालकांना दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी ३४ मिनिटे ३३ सेकंदांचा कालावधी लागतो. तर तेवढेच अंतर पार करण्यासाठी बंगळुरुमध्ये ३४ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो.म्हणजेच बंगळुरुपेक्षा कोलकातामध्ये गर्दी जास्त आहे,असे हा अहवाल सांगतो.
सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये पुणे तिसऱ्य़ा स्थानावर
