Home / News / सर्वात जुन्या मशीदीवर जर्मनीने घातली बंदी !

सर्वात जुन्या मशीदीवर जर्मनीने घातली बंदी !

बर्लिन- जर्मनी आणि युरोपमधील सर्वांत जुन्या मशिदीपैकी एक असलेल्याइस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग (आयझेडएच)आणि त्याच्या संबंधित संघटनांवर बंदी घातली आहे.पोलिसांनी देशभरातील ५३...

By: E-Paper Navakal

बर्लिन- जर्मनी आणि युरोपमधील सर्वांत जुन्या मशिदीपैकी एक असलेल्या
इस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग (आयझेडएच)आणि त्याच्या संबंधित संघटनांवर बंदी घातली आहे.पोलिसांनी देशभरातील ५३ मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर ही कारवाई केली.जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेझर यांनी सांगितले की,तपासातील पुराव्यांवरून आयझेडएचच्या कामकाजाबद्दल संशय निर्माण होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

आयझेडएचवर जर्मनीमध्ये इस्लामवादी-अतिरेकी, निरंकुश विचारसरणीला प्रोत्साहन देण्याचा आणि हिजबुल्लाला पाठिंबा देण्याचा आरोप आहे.जर्मन गृह मंत्रालयाने आयझेडएचला ‘इराणच्या ‘इस्लामिक क्रांतीच्या सर्वोच्च नेत्याचा थेट प्रतिनिधी” म्हणून वर्णित केले आहे, असा आरोप केला आहे की, ते इस्लामिक क्रांतीची विचारधारा जबरदस्तीने पसरवते आणि जर्मनीमध्ये अशीच क्रांती घडवण्याचे उद्दिष्ट ठेवते. इस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग हे हिजबुल्लाहशी त्याच्या कनेक्शनमुळे जर्मनीच्या देशांतर्गत गुप्तचर संस्थेच्या देखरेखीखाली आहे.त्याला जर्मनी एक ‘शिया दहशतवादी संघटना’ मानते आणि २०२० पासून तिला देशात कार्य करण्यास बंदी आहे.

Web Title:
संबंधित बातम्या