कोल्हापूर – शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील सरोज महिपती हांडे यांनी मलकापूर-कोल्हापूर मार्गावर एसटी महामंडळाच्या पहिल्या महिला चालक होण्याचा बहुमान मिळवला आहे. सरोज हांडे यांना दोन दिवसांपूर्वी विभाग नियंत्रकांनी निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले होते. त्यांना मलकापूर आगारात चालक म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने मलकापूर आगारात त्यांचे स्वागत झाले. त्यांनी मलकापूर-कोल्हापूर-मलकापूर अशी पहिली ट्रिप केली. पहिल्यांदाच महिला एसटी चालक पाहून प्रवाशांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सरोज हांडे यांनी २०१९ मध्ये एसटी महामंडळाच्या सरळसेवा भरती लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन या पदासाठी अर्ज केला होता. या पदाकरिता ३० हून अधिक अर्ज आले होते, परंतु सरोज हांडे यांचे चारचाकी आणि अवजड वाहन चालविण्याचे परवाने तसेच आवश्यक अर्हतेनुसार नियुक्तीला मान्यता मिळाली. त्यांनी वाहन चालक म्हणून प्रशिक्षण, परीक्षा आणि अन्य सर्व प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
सरोज हांडे कोल्हापुरातील पहिल्या महिला एसटी चालक
