सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड कनेरसर मूळ गावीला जाणार

पुणे – भारताचे विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे रविवारी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर गावाला भेट देणार आहेत. कनेरसर हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे गाव आहे. १० नोव्हेंबर रोजी चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होणार आहेत.कनेरसर ग्रामस्थांनी आग्रह केल्यामुळे ते आपल्या मूळ गावी येणार आहेत. ग्रामस्थांच्या वतीने त्यांची भव्य मिरवणूक काढून मानपत्र देऊन सन्मान करणार असल्याचे सरपंच सुनीता केदारी, अनंत चंद्रचूड, दिलीप माशेरे यांनी सांगितले. चंद्रचूड यांची २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी वर्णी लागली होती. त्यानंतर त्यांना ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पदोन्नती मिळाली होती. १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी तर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवाज्येष्ठतेनुसार सरन्यायाधीशपदाची चंद्रचूड यांनी शपथ घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top