*१५ प्रवासी गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ पुन्हा एकदा आयशर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली.उभ्या असलेल्या आयशर ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने पाठीमागून जोरदाची धडक दिली.या अपघातात १५ प्रवासी गंभीर जखमी झाले.यातील टेम्पो चालक आणि क्लिनर यांची प्रकृती चिंताजनक आहे.
समृद्धी महामार्गावर एक आयशर ट्रक काही कारणास्तव उभा केला होता. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो ट्रॅव्हल्स येऊन या ट्रकवर पाठीमागून धडकला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील सर्व १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.जखमींपैकी ट्रॅव्हल्स चालक आणि त्याचा सहाय्यक यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.