वाशिम –
समृद्धी महामार्गावर मुंबईहुन यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. या अपघातात जिवीतहानी झाली नाही. परंतु टेम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक झाला.
शॉर्टसर्किटमुळे टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्याचा अंदाज आहे. २० प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. अचानक आग लागल्याने संपूर्ण वाहन जळून खाक झाले. इंजिनमध्ये आग लागल्याचे समजताच चालक प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन गेला. सर्व प्रवाशांना खाली उतरल्याने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही.