समृद्धी महामार्गावर आलिशान कारचा अपघात! महिला जागीच ठार

बुलढाणा – समृद्धी महामार्गावर काल दिवसभरात दोन भीषण अपघाताच्या घटना घडल्या.सकाळी हरयाणा पोलिसांच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर सायंकाळी जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आलिशान कारला अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला तर कार चालक गंभीर जखमी झाला. दरम्यान यात एक चिमुकली थोडक्यात बचावली.समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा टोल नाक्याजवळ भरधाव बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झाला.या अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली असून कारचालक गंभीर जखमी झाला.तसेच तीन वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली.अपघातग्रस्त बीएमडब्यू कार मुंबईहून नागपूरकडे निघाली होती. ही कार वेगात जात असताना सिंदखेडराजा टोलनाक्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकाला धडकली.या भीषण अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली.तर चालकालाही गंभीर दुखापत झाली. अपघातातून ३ वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली.
दरम्यान,काल सकाळी याच महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील पांढरकवडा गावाजवळ हरियाणा पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला.या अपघातात पोलीस निरीक्षक महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर इतर तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.नेहा चव्हाण असे मृत पोलिस निरीक्षक महिलेचे नाव आहे.तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह,मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top