बुलडाणा – मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर दिवाळीसाठी अमरावतीला जाणाऱ्या एका कुटुंबातील पती, पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील इतर दोघेजण जखमी झाले आहेत.पुण्यातील दाभाडे कुटुंब दिवाळी साठी पुण्याहून अमरावतीकडे कारने निघाले होते. यावेळी समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३३४ वर त्यांची भरधाव कार एका ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की या कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचालक व कुटुंबातील मुलगी जखमी झाली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघे ठार
