मुंबई
मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रंदिवस स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणारे सफाई कामगार आता नवीन वेषात दिसणार आहेत. या कर्मचाऱ्यांना आता खाकी गणवेश बदलून रंगीबेरंगी गणवेश देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या ‘ए’ वॉर्डमध्ये प्रायोगिक तत्त्वावर येथील सफाई कामगारांना नवीन गणवेश देण्यात आला आहे. लवकरच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील २७,००० सफाई कामगारांना नवीन गणवेश देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने दिली.
नवीन गणवेशाबाबत सफाई कामगारांच्या संघटनांकडून हरकती सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.