मुंबई- मुरुड-दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपी उद्योजक सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे कदम यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. साई रिसॉर्टशी संबंधित सदानंद कदम व अनिल परब यांचा संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी ईडीने तत्कालीन दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनाही अटक केली होती. नियम धाब्यावर बसून साई रिसॉर्टला बिनशर्त परवानगी देण्यात आल्याचा आरोप जयराम देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्हा रोजगार हमीचे अधिकारी असलेले देशपांडे यांना साई रिसॉर्ट प्रकरणावरून सेवेतून निलंबित करण्यातही आले होते.
सदानंद कदम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ
